गुरुवार, ९ जानेवारी, २०२५

बालपण आणि शिक्षण

'मम्मा, तुला माहित आहे का सैटर्न (आपला शनी😀) इतका हलका आहे की तो पाण्यावर सहज तरंगु शकतो'. ऑ, खरच.. अस म्हणत मी फक्त आश्चर्यकारक चेहरा करायचा. नेहमीप्रमाणे तीचे बोलणे ऐकत होती. ती पुढे बोलू लागली, 'त्याला रिंग असल्याने तो आपल्या सगळ्या प्लेनेटमध्ये सुंदर दिसतो. तसे सगळेच प्लेनेट सुंदरच आहेत, जसे सगळे रंग असतात...' आपले बोलून ती परत नव्या खेळात गुंतली अन मी माझ्या बालपणात रमली. 

मला शनिची ओळख कशी झाली असेल? कदाचित शनिवारी नख, केस कापू नये अशी? की अमक्या तमक्याला शनी लागलाय अशी ? शनी शांत करण्यासाठी शनिवारी उपवास करावा लागतोय, त्याला तेल द्यावे लागते अश्या माहितीने? आठवतं का काही, स्वतालाच विचारु लागली. 

जाऊ देत, गाथाला माहित झालेला शनी खुप वेगळा आहे. कदाचित सगळ्यानाच असे आपले ग्रहतारे कळले असते तर... मात्र आपल्याला ओळख होते ते आपल्या कुंडलिच्या ग्रहांची अन खेळ सुरु होतो राशी अन कोणत्या राशीला कोणता ग्रह भारी याच्या भीतीचा.. 
मात्र जरी असे झालं तरी की सौर मन्डळ आधी शिकलो तर खरंच भय राहिलं नसतं? 

मग येवढे साइंस, विज्ञान का सौर मंडळचा अभ्यास करणारे यांना भिती दिसते ती कश्यामूळे? मंगळावर वा चंद्रावर माणुस पोहोचला, येवढे शोध लावलेत पण काय यापैकी कुणीच इतकं 'पुन्यवान' नसावं की स्वर्गांत जावून सगळं सगळं शोधून, फोटो काढुन खाली पाठवतील? 

माझ्यासारखीच अनेकाना नव्हे तर किंबहुना सर्वानाच मृत्यूची ओळख झाली ती माणुस मेल्यावर एक तर भूत बनतो नाहीतर पुण्यवान असेल तर स्वर्गात जातात. माझ्या लेकीने मानवी हाडाचा सापळा पाहिला तो म्यूजियममध्ये. कोणत्यातरी हेलोवीनच्या वीडियो मध्ये, तेही केवळ त्या सणाला पोशाख म्हणुन फनी makeup असतो, हेच तीला माहिती. 

मागील महिन्यात तीचे आजोबा गेले आणि नंतर ती एक दिवस सांगत होती की, कुणी मेले की खुप खुप दिवसानी त्याचे स्केलेटन/ सापळा बनतो. कधी कधी तिला आजोबा आठवले तर ती नाराज होतेच पण त्यांच वय झाले होते, ते आजारी होते म्हणून त्यांची एनर्जी संपली हे तिला माहीत आहे. एक दिवस सगळ्यांची एनर्जी पुर्ण नष्ट होते, हे निसर्गचक्र आहे म्हणे...  ती बोलते अन मी नुसत्या कल्पनेने शांत होते.

मला लहानपणी काय माहीत होतं? सकाळी आकाशात सूर्य असतो अन रात्रि चंद्र तारे हेच अनेक वर्षे असलेले ज्ञान. खुप उशिरा समजले की दिवसा पण चंद्र तारे असतात पण सूर्याच्या प्रखर प्रकाशामूळे आपल्याला दिसत नाही. आम्ही मात्र शिकलो, देवान लहानपनीच सूर्य गिळायला झेप घेतली... आता मोठी माणसं सांगतात तर खरच असेल हा विश्वास.

असो, माणुस अन सगळे जीवच नाहीतर कदाचित आपली पृथ्वी जो एकमेव ग्रह आहे की ज्यावर माणुस अन अन्य जिवंत राहू शकतात, ते सुद्धा नष्ट होईल? 800 मिलियन  वर्षापूर्वी आपल्या मदर अर्थ वर सुद्धा कोणता जीव नव्हताच, ते सगळ हळुहळु विकसित झाले.... गाथा पुरानानुसार 😊😊 जे जे निर्माण होते ते नष्ट होणारच

अजून तरी तिला भूताची भिती नाही कारण ते फक्त कार्टून किन्वा इमैजिनेशन म्हणजे कल्पना आहे यावर ती ठाम आहे. तिला भूत नाही तर मेल्यावर हाडाचा सापळाच होतो जो काहिच करु शकत नाही हे माहीत आहे. मला मात्र लहानपणी बाहेर अंधारात भूत आहेच, स्मशानाच्या रस्त्याने भूत असते हे इतकं बिंबवले आहे की, आजही भूताचे सिनेमे पाहणार नाही 😀😀. भूत नसते हे मान्य पण मनाला कोण सांगेल. 

असो, मातृभाषेत शिकले पाहिजे असं मलाही वाटतं पण भाषा कोणती यापेक्षा वैज्ञानिक दृष्टिकोन आणि शिकण्यात आवड, इंटरेस्ट ज्यात निर्माण होतो ते शिक्षण, ती भाषा, ते माध्यम महत्वाचं.