रविवार, २० एप्रिल, २०२५

आस्तिक

आम्ही सगळेच भुकेनं व्याकुळ
जेवणाचं ताट समोर आलं
पोट भरलं 
अन 
त्यांनी समाधान व्यक्त करत देवांचे आभार मानले
उन्हातान्हात राबणाऱ्या शेतकऱ्यांना मी कृतज्ञता व्यक्त केली....
माझ्याकडे बघत ते सगळे एका सुरात बोलले
तुझ्यासारख्या लोकांमुळे देशात अनर्थ होतोय, नरकात जाशील...
???
निःशब्द

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा