एक मैत्रीण दवाखान्यात आयाचे काम करणारी… (… मावशी), वय 30 वर्षे. शाळेत आठवीमध्ये
शिकत असतांना तिच्यापेक्षा तेरा वर्षे मोठ्या पंधरावी शिकलेल्या मुलाशी लग्न झाले.
आज ती दोन मुलींची आई, मोठी मुलगी दहावित शिकते. गेली पाच – सहा वर्षे नवरा काहीच काम करत नाही, त्याला वेड लागले म्हणतात.
वेडा असला तरि ती उशिरा आलेली चालत नाही, रोज दारू पाहिजेच. तिच्याच
आईच्या घरी एका खोलीत संसार करते, मूलींना शिकून मोठे करायचे स्वप्न पाहते. सर्वांचा खर्च कसाबसा
तीच करते. तरिपण त्याचे सर्व.... सहन करते. त्याला सोडावे असे तिला वाटत असले तरि तिची
आई तिला विरोध करते. कारण काय तर म्हणे शेवटी नवरा आहे, तोच तुला म्हातारपणीचा आधार....
स्वत: मेहनत करून, कष्टाची कमाई खात असली तरि तिच्या जिवनाचा निर्णय ती घेवू शकत नाही.
दुसरी सुशिक्षित व्यवसायाने डॉक्टर. नवरा सुद्धा अभियंता भरपूर कमावतो. दोन मुले, घरी सर्वच सुविधा उपलब्ध म्हणजेच सुखी कुटुंब. दर दोन - तीन दिवसानी मोठ्याने भांडणाचा आवाज, तिच्या आई - बहिनीवरून तिला शिव्या. जीव वाचविण्यासाठी त्या रात्री शेजारी मैत्रिणीकडे ती आधार घेणार, सगळे शांत होण्याची वाट पाहणार. सामाजिक प्रतिष्ठा म्हणून त्याला सोडू शकत नाही. . . या अश्या कितीतरी मैत्रिणी कोणत्या न कोणत्या कारणाने अपमानाचे जिणे जगत आहेत. काय हि समस्या नाही ? काय या व्ययक्तिक समस्या आहेत ? कोण अश्या विकृत पुरुषी मानसिकतेला दंड देणार आणि कोण तिला मानसिक / भावनिक आधार देणार ? काय हे समाजाचे काम नाही.?
एकीकडे एकुलती एक मुलगी म्हणून तिला हवे ते द्यायचे. समाजात प्रतिष्ठा, आदर्श निर्माण करायचा आणि अपेक्षा करायची कि तिला तिचे निर्णय स्वत: घेवू देणारा जीवनासाथी मिळावा. त्याचवेळी आपल्या पत्नीला काही येत नाही असे गृहित धरून तिला निर्णय घेण्यापासून परावृत्त करायचे. . काय एक मानव म्हणून आपण एकमेकांचा आदर करणार आहोत ?
म्हणे स्त्रिया सक्षम झाल्या.

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा